धानापूर येथे धरती आबा जनजातीय ग्राम उन्नत अभियान
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर:धानापुर गोंडपिंपरी:२४ जून मंगळवार रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा धानापूर येथे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान अंतर्गत धरती आबा जनजातीय ग्राम उन्नत अभियान (पीएम.-जनमन) योजनेबाबत आदिवासी बंधू - भगीनीकरीता शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्या अनुषंगाने आदिवासी जमातीचे लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, राशन कार्ड, जनधन बॅंक खाते, आयुष्यमान भारत कार्ड, पीएम. किसान कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, सिकलसेल ॲनिमिया आरोग्य तपासणी, नवीन विद्युत जोडणी इत्यादी सेवा सदर शिबिरात उपलब्ध करून देण्यात येत आहे.तरी गोंडपिपरी तालुक्यातील आदिवासी जमातीचे बंधू - भगीनी यांनी जास्तीत - जास्त संख्येने शिबिराचे ठिकाणी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसील कार्यालय गोंडपिपरी मार्फत करण्यात आली.
Related News
नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती पर युवा: परिवर्तन की आवाज संघटना ने किया माल्यार्पण
6 days ago | Naved Pathan
स्वच्छ भारत’ केवळ फलकांपुरतेच; हिंगणघाट शहरात सार्वजनिक शौचालयांचा तीव्र अभाव
6 days ago | Naved Pathan
भीम आर्मीचा नगरपरिषदेला इशारा : २५ तारखेपर्यंत स्वच्छता न झाल्यास कचरा थेट नगरपरिषदेत टाकणार
7 days ago | Naved Pathan